जामनेर राजमुद्रा दर्पण :- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आता विलीनीकरणासाठी शासना समोर उभा केलेला लढ्यात थोडी शिथिलता आणतं न्यायालय निर्णय देत नाही तोवर मध्यममार्ग निवडण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी आज व्यक्त केले. ते जामनेर एस.टी कर्मचारी यांच्या वतीने लोढा यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या आभार प्रसंगी बोलत होते.त्यांनी यावेळी सांगितले की आपला लढा हा शासनाकडे विलीनीकरणासाठी असुन सर्वसामान्यांच्या विरोधात नाही परंतु आपण पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा हैराण होत असुन.आता विलीनीकरणासाठी उभा केलेला लढा हा न्यायप्रविष्ट असुन त्याचा निर्णय यायला किती वेळ लागेल हे अजूनतरी अनिश्चित आहे.तसेच न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आपणही संयम ठेवत.शासनाकडुन अजुन काही मागण्यांसाठी संपकरी संघटनांना सोबत घेत शासनाजवळ सकारात्मक चर्चा करणार असल्याची ग्वाही देत लोढा यांनी संपकरी कर्मचारी यांना किराणा किटचे वाटप करीत संपा दरम्यान एसटी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन अगोदरच अतिशय तुटपुंजे असते त्यात संप चालु असल्याने आपल्या थोडीशी मदत म्हणून किराणा किटचे सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.