जामनेर राजमुद्रा दर्पण :- जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधीत आदेश लागु असतानां शेतकरी व सर्व सामान्य नागरिक यांचेवर विज तोडणी व वाढीव विज बिल माध्यमातून महाविकास आघाड शासनाने जो अन्याय चालविला आहे. तो थांबवावा.शेतकरी व सर्वसामान्य यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारीला तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता.मात्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश असल्याने भारतीय दंड सहिंता१८६०(४५)चे कलम १८८व मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३)चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे फिर्यादी सुनील माळी यांच्या फिर्यादीवरून आ.गिरीष महाजन यांचेसह दहा पदाधिकारी यांचे जामनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला.