जामनेर राजमुद्रा दर्पण :- शहरापासून काही अंतरावर असलेल्या हरिओम नगर जवळ २ दुचाकी वाहनांच्या अपघातात गजानन(प्रशांत) संजय पाटील राहणार पाळधी या तरुणाचा मृत्यू झाला तर नांद्रा प्र. लो.येथील सरपंच मिलिंद गांगुर्डे व त्यांच्या पत्नी ममता गांगुर्डे जखमी झाले आहे. वाकी गावालगत असलेल्या हरिओम नगर जवळ सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास नांद्रा प्र. लो. येथील सरपंच व त्यांच्या पत्नी दुचाकी वर जामनेर कडे जात असताना समोरून जामनेर कडून पाळधी गावाकडे जाणारा प्रशांत संजय पाटील या दोघ दुचाकी स्वारांची समोरा समोर धडक झाली. या अपघातात प्रशांत पाटील यांचा मृत्यू झाला असून नांद्रा येथील सरपंच व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सदर मयत बाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.