भरवस्तीत पहिल्यांदा घडली जबरी चोरीची घटना
जामनेर राजमुद्रा दर्पण :- प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व मध्यरात्रीच्या सुमारास आयडीबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मधुन गँस कटरचा वापर करत चोरट्यांनी १३ लाखांच्या वर रकमेवर हात साफ करीत धाडसी चोरी केली होती. त्या घटनेला २ दिवस उलटत नाही तोवर जुन्या गावातील भरवस्तीत एका घरात घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधुन८ लाखाच्या एकुण मुद्देमालासह धाडसी चोरी करत पोबारा केला. जुन्या गावातील सुतार गल्ली भागात राहणारे विनोद लोढा हे काही दवाखान्याच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते.हिच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडत घरातील कपाटातून ५ लाख रूपये रोख रक्कम व १० तोळे सोने असा जवळपास ८ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरटे चोरी करून पसार झाले.विनोद हे मुंबईवरून आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस स्टेशनमध्ये कलम ४५४,४५७,३८०, प्रमाणे प्राथमिक स्वरूपात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन.तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे. याआधीही शहरात एटीएममधील रक्कम किंवा एटीएम मशीनच उचलुन नेण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. मात्र या वेळेस चोरट्यांनी पुर्व नियोजन करून एटीएम मधील एवढी रक्कम चोरून नेल्याची घटना पहिल्यांदाच घडली.तर जुन्या गावातील भरवस्तीत असलेले विनोद लोढा यांच्या घरातही झालेली मोठ्या रकमेची झालेली चोरीची घटना पहिल्यांदाच या घटनां नंतर नागरिकांनी सुद्धा जागरूक राहणे आवश्यक आहे. तसेच पोलिस प्रशासन समोर या धाडसी चोरींच्या घटनांमुळे चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आहे.