स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी; आरोपी पवन माळीस अटक
जामनेर राजमुद्रा दर्पण प्रतिनिधी :- येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या पात्रात पुलाखाली ३१ जानेवारीच्या मध्यरात्री नंतर संशयास्पद अवस्थेत युवकाचा म्रुतदेह आढळून होता.या युवकाची हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी समजत असले तरी घटनेबाबत काही ठोस पुरावे घटनास्थळी आढळून न आल्याने जामनेर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची अकस्मात म्रुत्यु म्हणून नोंद करण्यात येवुन त्या दिशेने पोलिस तपास करत होते.मात्र याबाबत २ आठवडे उलटून गेल्यानंतरही पोलीसांच्या हाती घटनास्थळाच्या सिसीटिव्हि फुटेजच्या व्यतीरीक्त काहीच नव्हते. यामुळे हि घटना अपघात कि हत्या या विषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
दरम्यान घटनेची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे मयत शुभम माळीचा मामेभाऊ पवन अशोक माळी यानेच पैशाच्या वादातुन हत्या केल्याचे समोर आले.आरोपी पवन माळी याला नाडगाव ता.बोदवड येथुन आज दुपारी अटक केली. आपणच शुभमची हत्या केल्याची गुन्ह्याची कबुली पवन याने दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षण किरणकुमार बकाले,पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे,अशोक महाजन,सुनिल दामोदरे,लक्ष्मण पाटील, किशोर राठोड,रणजित जाधव,श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, मुरलीधर बारी,संदिप सावळे,ईश्वर पाटील यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.