जामनेर(राजमुद्रा दर्पण) :- शहरातुन जाणाऱ्या कांग नदीवरील उंचीला छोटा असलेल्या पुलामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराने मुख्यतः औरंगाबाद- भुसावळ,बुलडाणा असे जोडला जाणारा मार्गाचा वाहतुकीचा तासनतास खोळंबा व्हायचा.तसेच शहरातील नागरिकांना शहरातुन जामनेर पुरा,शास्रीनगर, इंदिरा आवास,दामले प्लॉट परिसरात जाण्यासाठी पुरामुळे दमछाक व्हायची यापासून जामनेरकर व दळणवळण करणाऱ्या वाहनांची सुटका होणार आहे.असे आ.गिरिष महाजन यांनी भुमीपुजनच्या प्रसंगी सांगितले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत येणाऱ्या १२ कोटी ४ लाख रूपये तरतूद असणाऱ्या का या कामाला लगेचच सुरुवात होणार असुन.शहरातील शिवाजी नगरपासुन जळगावकडे जाणाऱ्या नेरी पर्यंतच्या १६ कोटी रूपयांची तरतूद असलेल्या चौपदरी रस्त्याचेही भुमीपुजन महाजन यांनी केले. यावेळी जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता आर.डी.पाटील,शाखा अभियंता एन.आर.जैस्वाल,मनोज पाटील,आदीसह जितेंद्र पाटील,महेंद्र बाविस्कर,डॉ.प्रशांत भोंडे व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर उपस्थित होते.