जामनेर राजमुद्रा दर्पण:- तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी पणे राबण्यात आली.सकळी ८ वाजेपासून तालुक्यात २२६ पोलिओ बूथची स्थापना करण्यात आली होती.यासाठी ६२५ आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाचे कर्मचारी यांनी कामकाज केले.तसेच शहरात उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्याद्वारे पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. लोक प्रतिनिधी यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून सर्व बूथचे उद्घाटन करण्यात आले.यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून
४६३०० डोस प्राप्त झाले होते.
आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी ७३००० घरांना भेटी देऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले.तालुक्यात एकूण ३८१८२ बालकांना आज एकाच दिवशी पोलिओ डोस पाजण्यात आले.वीटभट्टी, शेतात राहणारे, उतारकरू,खडीमशिन प्लँन्ट,पोहचण्यास अवघड भाग यासाठी ११ मोबाईल टीम नेमून लस देण्यात आली.
आज जे लाभार्थी काही कारणास्तव पोलिओ डोस घेऊ शकले नाही त्यांना एक दिवसाच्या खंडाने पुढील तीन दिवस पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.