पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल जाणार असल्याच्या मार्गावर आकाशवाणी चौकात निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र यापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे यावेळी राष्ट्रवादीकडून राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्याचा जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल जाण्याच्या मार्गावर निषेध व्यक्त केला राज्यपाल भगतसिंग कोसारी जळगाव दौऱ्यावर असून यांच्या उपस्थितीत जैन हिल्स व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जैन हिल्स येथून कार्यक्रम आटपून राज्यपाल विद्यापीठाकडे दुपारी एक वाजता निघणार होते याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यापूर्वीच काळे झेंडे दाखवून यापूर्वी त्यांना ताब्यात घेतले राज्यपाल भगतसिंग दोषारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला राज्यपालाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या तसेच या वक्तव्याची तक्रार महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे करणार असून त्यांना लवकरात लवकर या पदावरून हटवण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते