जामनेर राजमुद्रा दर्पण:- तालुक्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगर परिषद निवडणुका प्रहार जनशक्ति पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे तालुका अध्यक्ष प्रदीप गायके यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये उत्तरं महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्या आदेशाने जाहिर केल. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका,नगर परिषद संदर्भात आज भगिरथी ओसवाल मंगल कार्यालयात पत्रकार परिषद आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रदीप गायके यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की प्रहार जनशक्ति पक्ष आज सत्तेच्या माध्यातून जनहिताची कामे करत असुन पक्षाचे नेते जलसंपदा व शिक्षण राज्य मंत्री नामदार बच्चू कडू प्रदेशाध्यक्ष अनील गावंडे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल भाऊ चौधरी हे पक्षाचा विस्तार गाव खेड्यापर्यंत करण्यासाठी कार्यतत्पर आहेत ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाचे लोक प्रतिनिधी जास्तीत जास्त कसे वाढवता येतील यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने कंबर कसली आहे. तशी रणनिती आखली असून या रणनिती साठी सर्वप्रथम निवडणूका पूर्ण ताकदीनिशी साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून रंजल्या गांजल्या उपेक्षित घटकाला कसा न्याय देता येईल अशा पद्धतीने निवडणुक लढणार असून युवक युवती शेतकरी कष्टकरी यांना निवडणुकीच्या माध्यमातून लोक प्रतिनिधीत्व देण्याचा पक्षाचा संकल्प आहे.
प्रत्येक पक्षाला आपला पक्ष विस्तार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असून त्यासाठी प्रत्येक पक्षाला स्वबळाचा नारा देणे क्रमप्राप्त आहे. म्हणून आम्ही निवडणुकांसाठी स्वबळाची घोषणा करीत आहोत. आज आम्ही राज्यसरकारच्या सत्ता पक्षात असले तरी वरिष्ठ पातळीवरून आघाडी किंवा युतीचा निर्णय झाल्यास तो आम्हास मान्य असेल परंतु युती किंवा आघाडी नाही झाली तर आमची तयारी असावी याच उद्देशाने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत मागील तीस वर्षापासून जामनेर पंचायत समिती व जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपाची सरशी आहे तर तेच सत्ता केंद्रावर आहेत याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी थोड्याफार जागा घेऊन विरोधी पक्षात आहे परंतु सत्ताधारी यांनी भ्रष्टाचाराचा अगडबम उभा केला आहे. तर अपुरी ताकद काँग्रेस-राष्ट्रवादीची त्यांना रोखण्यात कमी पडत आहे अशावेळी जामनेर तालुक्यातील जनता सक्षम तिसरा पर्याय शोधत आहे. आणि हाच तिसरा सक्षम पर्याय प्रहार जनशक्ती पक्षाच्या रूपाने आम्ही देणार आहोत आज पंचायत समितीमध्ये अधिकारी व पदाधिकारी यांच्या आर्थिक साटे लोट्यातून जागोजागी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे तर शासनाच्या योग योजना सर्वसामान्य योग्य लाभार्थींपर्यंत पोचत नाही अशा या विपरीत परिस्थितीत तालुक्यात परिवर्तनाची नादी आणायचे असेल तर मीडियाच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील युवकांना आवाहन व आश्वस्त करतो कि आपण प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा पंचायत समितीचे १६ गण व ८ जिल्हा परिषद गट या सर्व ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष आपले उमेदवार देणार आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे वाघारी बेटावद गटातील वडगाव टिग्रा येथील प्रमुख कार्यकर्ते सागर चौधरी उर्फ भैया यांनी तसेच डोहरी तांडा येथील भाजपा कार्यकर्ते अनिल तंवर,नेरी गटातील देवपिंप्री गावचे माजी सरपंच यांचे चिरंजीव उमेश कोळी यांनी प्रहार पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्षात रीतसर प्रवेश केला तसेच चिंचखेडा तवा येथील भाजपचे गजानन वाघ व लहासर येथील भाजपाचे बुथ प्रमुख अजय शिंदे यांनी ही प्रहार जनशक्ती पक्ष सोबत पुढील राजकीय कारकीर्द सुरू केली आहे आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या युवकांना आपण जे आवाहन करीत आहात त्याबद्दल पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले यांनी सविस्तर विवेचन करताना सांगितले की युवकांची ऊर्जा एखाद्या राजकीय नेत्याच्या चुकीच्या कामासाठी किंवा त्याचे लागुन चालणं करण्यासाठी न वापरता ती गाव खेड्यातील विकासासाठी कशी वापरता येईल त्याच उत्तम आदर्श प्रहार जनशक्ति पक्ष उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले या वेळी पत्रकार परिषदेला युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळ उपस्थित होते.