जळगाव राजमुद्रा दर्पण | मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद सोबतचे असलेले आर्थिक व्यवहार समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून या संदर्भातला पुढील तपास देखील सुरू आहे. मंत्री नवाब मलिक यांना ईडीने कोठडी बजावली असताना मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही. यामुळे जनमानसात उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे. देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असताना मात्र मंत्रि पद महाविकासआघाडी ने नवाब मलिक यांचे कायम ठेवले आहे. मंत्री जेलमध्ये असताना मुख्यमंत्र्यांनी अद्याप पर्यंत मलिक यांचा राजीनामा कसा घेतला नाही ? असा सवाल जळगाव लोकसभेचे खासदार उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.