जळगाव राजमुद्रा दर्पण | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठी प्रतिष्ठान व जळगांव जनता बँक सहकार्याने 15 महिलांना पिंक ऑटो प्रशिक्षण देण्यात येणार आहे.बँक आर्थिक सहाय्य करणार आहे.खुशाल ऑटोमोबाईलने रिक्षा वितरण व प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. श्री शाम लोही (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी)च्या हस्ते पिंक ऑटो चे शिकाऊ लायसन्स आज देण्यात आले.
आर टी ओ कार्यालयात दुपारी 3 वाजता कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री पुंडलिक पाटील, संचालक सुनील अग्रवाल,संचालिका सौ.आरती हुजुरबाजार,सौ. सावित्री साळुंखे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, विश्वस्त सौ निलोफर देशपांडे,डॉ सविता नंदनववार,जनता बँकेचे हेमंत चंदनकर बचत गट प्रमुख वैशाली महाजन,मनीषा आवारे, उपस्थित होते.शेख जब्बार,शेख सत्तार यांनी आभार मानले