मुंबई राजमुद्रा दर्पण : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप च्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते काढलेला मोर्चा आझाद मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेट्रो सिनेमाजवळ अवडण्यात आला आहे. शेकडोच्या संख्येने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर मोर्चेकरी भाजप नेत्यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचं आव्हान केलं आहे. मात्र, मोर्चेकरी अजूनही घटनास्थळी आंदोलन करताना दिसत आहेत. आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.