मुंबई राजमुद्रा दर्पण : जगभरातील हिंदू धर्मात सुर्यग्रहणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक च्या म्हणण्यानुसार विज्ञानाच्या चमत्कारात सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. पुराणानुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही. यासाठी विशेष नियम पाळले जातात. दरवर्षीप्रमाणे 2022 मध्ये वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार तसेच ज्योतिष्यांनी ग्रहण होणार असल्याचे सांगितले आहे. खास करुन गरोदर महिलांना या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते जेणेकरून होणाऱ्या प्रसूती वर कोणतेही विपरीत परिणाम होणार नाही असे जाणकार सांगतात.
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात.
नवीन वर्षातील 2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल, शनिवारी होणार असून. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. मात्र, भारतातील हे पहिले सूर्यग्रहण अंशत: असेल. त्यामुळे याचा भारतात मोठा परिणाम झालेला दिसून येतो. नैसर्गिक दृष्ट्या सूर्यग्रहणाचे फायदे तसेच विपरीत नुकसान देखील आहे मात्र यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात.
हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये पाहता येणार आहे. आकाशात घडणाऱ्या गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर खोल परिणाम होत असतो. नैसर्गिक चक्र देखील यामुळे बदलाचे संकेत देत असते. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार या सूर्यग्रहणाचासुद्धा काही राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे. त्या राशी नेमकं कोणत्या हे जाणून घ्या खालील प्रमाणे –
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. या काळात केलेले सर्व प्रवास फायदेशीर ठरतील.
कर्क राशीसाठीही हे ग्रहण शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या कामात यश मिळेल. त्याच प्रमाणे तुम्हाला मित्रांकडून लाभ मिळू शकतो आणि त्याच वेळी नोकरीच्या ठिकाणी आणि समाजात तुमची कीर्ती वाढ होऊ शकते. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामातही नफा अपेक्षित आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या संदर्भात कामाच्या ठिकाणी वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता.
धनु- तुमची आर्थिक स्थिती बरीच सुधारेल. हे ग्रहण सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही शुभ आणि फलदायी ठरेल. नोकरदारांना परदेशात नोकरी मिळेल. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा आणि उत्कर्षाचा असणार आहे.