पुणे राजमुद्रा दर्पण : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरें यांनी त्यांच्या खास शैलीत धडाडीने भाषण करीत राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांचे मन जिंकले आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांचा समाचार घेतलाच, मात्र यावेळी त्यांनी राज्याचे राज्यपाल यांना देखील रडारवर ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यपालांची नक्कल करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज ठाकरेंनी समाचार घेतला आहे. हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला जातीत गुंतवून ठेवत आहे,. शिवाजी असं नुसतं नाव ऐकू आलं की हा माणूस उठून जायचा, काहीतरी सापडेल या आशेने, असे म्हणत हे परवा आमचे राज्यपाल. काहीसमज बिमज आहे का ? मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, बघितलं ना कसंय ते? असे म्हणत थोड मागे झुकत, वाकडं होत राज ठाकरेंनी राज्यपालांची हुबेहुब नक्कल केली. यावेळी संपूर्ण सभागृहात राज ठाकरे चा ट्रेलर बघता कार्यकर्त्यांनी छत्रपती च्या नावे घोषणा देण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या पहिल्या भेटीबाबत सांगताना राज ठाकरे यांनी सांगितले, पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा वाटलं की माझा हात बघायला लागतील की आप का मंगल कहा पै है..? तुम्हाला काही माहितीये का? महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं. रामदास स्वामींनी काय लिहीलेय, छत्रपतींनी काय लिहीलंय ते माझ्या घरात लावलंय मी. शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. वाचा ते निश्चयाचा महामेरू…कोण श्रीमंतयोगी…असे म्हणत त्यांनी राज्यपालांचा समाचार घेतालाय. तसेच आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कळतं श्रीमंतय, अशी कोपरखिळी मारताना राज ठाकरे दिसून आले आहे.
आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या त्याही वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. यानंतर कोंबड्या लागल्या झुंजायला, मग आता दोन दिवसांनंतर कळलं, निवडणुका होत नाही, मग सगळे पुन्हा शांत, असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना देखील धारेवर धरत समाचार घेतला आहे.
निवडणुका लांबणीवर पडणार हे नोव्हेंबरपासून सांगत होतो. मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. मी काही पत्रकारांशीही बोललो होतो, निवडणूक आली ना की ती चढायला लागते. आता बरोबर कळला तुम्हाला निवडणुकीचा अर्थ, साला चढायला लागते म्हणजे काय? तर अशी ती स्पर्श करते. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना, असेही राज ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले आहे.