पुणे : राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महापुरूषांच्या केलेल्या वादग्रस्त विधाना वरून राज्यपालांना टार्गेट खरपूस समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या बाबत बोलताना वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून राज ठाकरे यांनी आज मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांवर चांगलेच बरसताना दिसून आले आहे. राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत. त्यांनी राज्यपालांच्या ब्रम्हचार्याचाही समाचार घेतलाय. राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या लग्नातील वयावरून वादग्रस्त विधान केले होते.
तर छत्रपती शिवाजी महाजारांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही ते बरसले आहेत. आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या त्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे.