जळगाव राजमुद्रा दर्पण — नोव्हेंबर २०२१ या महिन्यांमध्ये जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदाच्या व महानगर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ४० हजार युवकांची नोंदणी करण्यात आली या चाळीस हजार युवकांच्या नोंदणी मधून तब्बल २४ हजार युवकांनी देवेंद्र मराठे यांना पसंती देऊन भरघोस अशा मातांनी विजय केला त्याच पद्धतीने जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी म्युझिक पटेल यांना दिड हजार मतांनी निवडून दिलं
या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांचा उमेदवार हितेश पाटील यांचा मा खा डॉ उल्हास पाटील यांचा उमेदवार देवेंद्र मराठे यांनी तब्बल १५ हजार मतांनी पराभव केला… निवडणूक अतिशय चुरशी ची ठरली परंतु नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी त्यांच्या एन एस यु आय जिल्हाध्यक्ष पदाच्या ११ वर्षच्या काळात केलेल्या उत्तम कामगिरी वर आज हे यश मिळाले आहे या निवडीचे संपूर्ण श्रेय प्रदेश उपाध्यक्ष मा खा डॉ उल्हास पाटील, गोदावरी फौंडेशन चे प्रशांत किशोर म्हणजेच डॉ प्रशांत वारके, बाबा देशमुख, शोएब पटेल व सर्व युवक मतदार यांना जाते या निवडीमुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले भटके-विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन भाऊ जाधव जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते श्रीधर बापू चौधरी जळगाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विनोद जी कोळपकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अविनाश भालेराव महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मुक्तदीर देशमुख महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई मोरे रावेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन राहुल बाहेती, डॉ शोएब पटेल, नदीम काझी, आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला
एक विद्यार्थी ते युवक नेत्या पर्यंतची वाटचाल
सन २००७ साली म्हणजेच वयाच्या १९व्या वर्षी एक गादी आणि पेटी घेऊन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरता एक विद्यार्थी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दाखल झाला. शहरातील गांधिनगर जिल्हापेठ येथे एका आठ बाय आठच्या पाचशे रुपये प्रति बेड महिन्याच्या शेअरिंग रूममध्ये वास्तव्यास आला. प्रथम वर्षापासूनच गुणवंत म्हणून सर्वच प्राध्यापकांच्या नजरेत हा विद्यार्थी होता. हा विद्यार्थी प्रथम वर्षांमधील आपल्या क्लासचा सी. आर.वर्गप्रतिनिधी झाला. प्रथम वर्षांमध्ये युनिव्हर्सिटी टॉपर म्हणून या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे व स्वतःचे नाव लौकिक केले. २३ फेब्रुवारी २००८ हा दिवस प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रथम आल्याबद्दल या विद्यार्थ्याचा सत्कार माजी खा डॉ उल्हास दादा पाटील यांच्या जन्मदिवशी व त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तीच प्रथम भेट माजी खासदार डॉक्टर उल्हास दादा पाटील व या विद्यार्थ्यांची… प्रथम भेटी मध्येच माजी खा.डॉ.उल्हास दादा पाटील यांनी या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण ओळखले व त्याच वर्षी प्रथमतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत निवडणुकांचा सत्र सुरू झालं काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना म्हणजेच एन एस यु आय या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक ही २००८ झाली सुरू झाली या निवडणुकीमध्ये माजी खासदार डॉक्टर उल्हास दादा पाटील यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्याला या निवडणुकीमध्ये आपला स्वतःचा उमेदवार म्हणून एनएसयूआय जिल्हाध्यक्षपदासाठी उभे केले निवडणूक अतिशय चुरशीची उमेदवार एकही अतिशय नवखा संपूर्ण जिल्हा काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण हे अतिशय मोठ्या प्रमाणात विखुरलेले असताना देखील या विद्यार्थ्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन एनएसयूआय ची सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली व मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली या सदस्य नोंदणी च्याच बळावर ती या विद्यार्थ्याला २००८ प्रथमच एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पदी मोठ्या मतांनी विजय मिळाला. यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असेच सोडवत व पुढे वाटचाल करत २०१२, २०१५, २०१८ सलग चार वेळेस एन एस यु आय जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळाला .