जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर विविध आरोप करून खळबळ उडवून दिली होती यावरून सरकारी वकील चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळत माझा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला होता. माझ्या कार्यालयातील रेकॉर्डिंग जळगाव मधील रहिवासी असलेल्या तेजस मोरे यांनी एक घड्याळ भेट देऊन त्यामध्ये कॅमेरा लावून केल्याचा आरोप सरकारी वकील चव्हाण यांनी केला आहे. केल्याचा गौप्यस्फोट केला त्यावरून तेजस मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत मी सरकारी वकिलांचे कोणतेही रेकॉर्डिंग केलेले नसून विनाकारण मला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
कोणतेही पुरावे नसताना बेछूट आरोप करण्यात येत असल्याचे तेजस मोरे यांनी सांगितले आहे. काही पुरावे माझ्या कडे असून ते मी लवकरच समोर आणणार असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील चव्हाण हे विरोधी पक्षातील नेत्यांना अडकविण्या साठी सत्ताधारी नेत्यांसह मिळून कट रचत असल्याचा आरोप करत काही व्हिडिओ आणि ऑडिओ विधानसभा अध्यक्षांना सादर केले होते. यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर चव्हाण यांनी मोरे यांनी मला भिंतीवरील घड्याळ भेट दिले होते, त्यात कॅमेरा बसवून माझे स्टिंग करण्यात आले, असा आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता, त्याला मोरे यांनी आज प्रति उत्तर दिले.
तेजस मोरे म्हणाले की, प्रवीण चव्हाण यांना मी जुलै २०२१ पासून ओळखत असून, मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते, त्या गुन्ह्यात त्यांनी मला जामीन मिळवून दिला होता. जामीन झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात माझे जाणे-येणे होत होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की जबाबासंदर्भातील दोन-तीन ड्राफ्ट करायचे आहेत. माझे इंग्लिशवर कमांड नाही. तुझं इंग्लिश चांगलं असल्यामुळे तू मला ड्राफ्ट तयार करून दिले तर बरं होईल. त्याअनुषंगाने माझे त्यांच्या कार्यालयात जाणे-येणे वाढले. मात्र, ते कशाचे ड्राफ्ट तयार करत आहेत, हे त्यावेळी मला माहीत नव्हते. जसजसं मी ड्राफ्ट करायला लागलो, तसतसं मला समजायला लागले की रमेश कदम, बीएचआर बॅंक, रवींद्र बराटे किंवा गिरीश महाजन यांचे प्रकरण असो यासंदर्भातील वेगवेगळे जबाब तयार करून घ्यायचे. पोलिसांना पुरविण्यात येणारी माहितीही तेच पहायचे. हे सर्व ते माझ्याकडून करून घ्यायचे असे तेजस मोरे यांनी चव्हाण यांना उत्तर देताना माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे.
मला कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे ते काय करत आहेत, हे मला समजायचे नाही. मला वाटायचं की हे सरकारी वकिलाचे काम आहे. कारण, त्यांच्याकडे पोलिसांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामुळे त्याबाबतचे ज्ञान नसल्यामुळे मला त्यात गैर काही वाटायचे नाही. ते जे सांगायचे, ते मी करत जायचो. गिरीश महाजन यांच्यासंदर्भात जबाब देण्यासाठी जे साक्षीदार यायचे, त्यांचे जबाब हे चव्हाण करून घ्यायचे. ते जबाब देण्यासाठी मलाही पोलिस ठाण्यात चव्हाण पाठवायचे. पण ९ जानेवारी रोजी जो छापा टाकण्यात आला. त्यानंतर माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. सरकारी वकिल छापा टाकण्याचे मॅनेज करत आहेत आणि पोलिस त्यांचे ऐकतात, हे कसं काय, असा प्रश्न मला पडला, असे मोरे यांनी स्पष्ट केले.पूर्वी बांधकाम व्यावसायिक असलेले तेजस मोरे म्हणाले की, माझे दोन-तीन वकील मित्र आहेत, त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर समजले की चव्हाण जे करत आहेत, ते चुकीचे आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यापासून मी हळूहळू बाजूला होत गेलो.
तेजस मोरे यांची या प्रकरणात एन्ट्री झाल्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फडणवीस हेदेखील सीबीआयकडे यासंबंधी काही पुरावे सादर करणार आहे. याप्रकरणात फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हटले की हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे. हे प्रकरण महा विकास आघाडी ला अडचणीत आणणारे ठरणार असल्याचे देखील जाणकार सांगत आहे.