जळगाव राजमुद्रा दर्पण | विरोधी पक्षातील नेत्यांन विरुद्ध कटकारस्थान रचत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर केला होता. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ तसेच ऑडिओ देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून प्रसारमाध्यमांसमोर आणले, हेच पुरावे विधान सभा अध्यक्षांकडे देखील सोपवले मात्र हे प्रकरण सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या, सरकारी वकील चव्हाण यांनी जळगावच्या तेजस मोरे नामक माझ्या कार्यालयात रेकॉर्डिग केल्याचा आरोप केला हे सर्व आरोप तेजस मोरे यांनी माध्यमांसमोर फेटाळून लावले तसेच सगळं कटकारस्थान हे तत्कालीन गृहमंत्री देशमुख व माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या सांगण्यावरून घडले असल्याचा गौप्यस्फोट तेजस मोरे यांनी केला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विधान भवनामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे रेकॉर्डिंग मध्ये नाव असल्याचे म्हटले होते त्यानुसार सीबीआय चौकशी याप्रकरणात झाल्यास माजी मंत्री खडसे यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी फडणवीस साहेब सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत असताना माझें अशिल तेजस मोरे यांनी रेकॉर्डिग करणारे घड्याळ भेट देऊन रेकॉर्डिग केली असल्याचा आरोप केला प्रवीण चव्हाण यांनी केला होता. मात्र तेजस मोरे यांनी चव्हाणां या प्रकरणी पुरावे सादर करावे अन्यथा वकील चव्हाण यांनी कशा पद्धतीने कटकारस्थान रचले ते पुरावे मी समोर आणेन असे तेजस मोरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची यापूर्वीच तिची चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असताना भाजप नेत्यान विरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोप खडसेंवर करण्यात आला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कोठडीत आहे. खुद्द फडणवीस या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेकडे पुरावे सादर करून तक्रार दाखल करणार आहे.