चाळीसगाव राजमुद्रा दर्पन : भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल नेताजी चौक, कामगार भुवन येथे काल दिनांक १५ मार्च २०२२ वार मंगळवार रोजी कळी उमलतांना या विषयावर ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील समुपदेशक – रणजीत सखाराम गव्हाळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ७वी, ८वी आणि ९वी च्या विद्यार्थींनींना किशोर वयात होणारे भावनिक, मानसिक व शारीरिक बदल आणि त्यावेळी घ्यायची काळजी यावर मानसशास्त्र तज्ञ रणजीत गव्हाळे सर यांनी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्याची व वापरानंतर तो नष्ट कसा करावा याविषयी माहिती दिली, तसेच ह्या दिवसात मुलींनी कोणकोणती काळजी घ्यावी यावर काही समस्या वाटल्यास घरातील आई, बहिण किंवा मैञीण यांच्याशी संवाद साधून मनमोकळे पणाने आपले Problem सांगून योग्य ती काळजी घ्यावी असे सांगण्यात आले. मुलींनी आपल्या मनातील शंका उपस्थित करुन त्यांची योग्य उत्तरे सरांनी दिलीत.
याप्रसंगी प्राचार्य श्रध्दा ठाकूर यांनी रणजीत सरांचे शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून स्वागत केले तसेच प्रेसिडेंट चंद्रकला साळुंखे यांनी क्लबची ट्राफी देवून त्यांचा सत्कार केला.सुनिता भोसले व श्रध्दा ठाकूर यांनी प्रेसिडेंट चंद्रकला साळुंखे यांनी विद्यार्थींनीसाठी उपयुक्त प्रोजेक्ट आयोजित केला म्हणून त्यांचाही शाल व गुलाबपुष्प देवून सत्कार केला.
यावेळी एकूण ६० विद्यार्थीनी उपस्थित होत्या, कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उर्मिला बेलेकर, माधवी मॅडम, गायके मॅडम व शिक्षक / कर्मचारी स्टाफ यांनी परिश्रम घेतले.