जळगाव राजमुद्रा दर्पण |राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत जलम बाळासाहेब ठाकरे असे विधान केले होते, या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांसमोर बोलतांना खडसे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्याचे म्हटले आहे. हिंदुत्वाचे प्रकार विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले असे खडसे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस हे मला वडीलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे निराशेतून आलेले वक्तव्य असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 साली मुंबईत उसळलेली दंगल आणि इतर घटनांच्या वेळी धारिष्ट्य दाखवले एवढेच नाही. तर या संघटनांमध्ये प्रतिकार करण्याची भूमिका देखील स्वर्गवासी बाळासाहेबांनी घेतली होती त्याकाळी बहुतांश राष्ट्रीय संघटना या घाबरलेल्या होत्या कोणत्याही पक्षाची रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याची हिम्मत त्यावेळी झाली नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला मात्र एमआयएम सोबत युती झाली नसताना देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.