निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण दौरा
जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथील ‘शिवतिर्थ’ निवासस्थानी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेवून जळगाव जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी अमित ठाकरे यांचा सत्कारही मनविसे पदाधिकाऱ्यांनी केला. गेल्या काळात मोठ्या प्रमाणात मनसे नेत्याचे जळगाव जिल्हा दौरे होत असत मात्र गेल्या काही काळापासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये सतत येणारे अपयश यामुळे मोठ्या प्रमाणात मनसेची पीछेहाट झालेली दिसून आली, या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी बैठक चर्चेदरम्यान ठरले की, पुढील एप्रिल महिन्यात मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण जळगाव जिल्हा मनविसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे. ते आमंत्रण अमित ठाकरे यांनी स्विकारले असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहिती वरून समजते.
नवीन कार्यकारणी होणार जाहीर
जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जम्बो कार्यकारिणी अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यात होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची मनविसे जिल्हा पदाधिकारी योगेश पाटील, पंकज चौधरी, चेतन पाटील, कुणाल पवार या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून बैठक संपन्न झाली.