मुंबई राजमुद्रा दर्पण | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे तसेच रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालकीचे 11 फ्लॅटस आज ईडीने जप्त केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शिवसेनेला मोठा धक्का तंत्र मानला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाच्या नातेवाईकांमध्ये ईडीने कारवाई सुरू केल्याने राजकीय खळबळ माजली आहे.
ईडीने केलेल्या कारवाईमुळे श्रीधर पाटणकर यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने केलेली ही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पाटणकर यांच्या माध्यमातून तार जोडून आली आहे. नेमकं या प्रकरणामुळे राज्यभरात राजकीय घडामोडींना मोठ्याप्रमाणात वेग आला आहे. किरीट सोमय्या यांनी देखील उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत ती का केली आहे. उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही.. अशी खरमरीत टीका देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील सूडबुद्धीने ही कारवाई केली गेली असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
कोणत्या कारणामुळे नेमकी कारवाई ?
1. रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.
2. ईडीने या कंपनीच्या 11 फ्लॅट जप्त केले आहेत पाटणकर यांच्या कंपनीला 30 कोटी रुपयाचं विनातारण कर्ज हमसफर डीलर कंपनीने दिल होतं.
3. हमसफर डीलर ही बनावट कंपनी असल्याचा आरोप आहे.
4. हमसफर डीलर ही नंदकिशोर चतुर्वेदी यांची कंपनी आहे.
5.नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे पाटणकरांच्या कंपनीत टाकण्यात आले.
6.नंदकिशोर आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे.
7. मनी लॉन्ड्रिंग च्या तीस कोटी रुपये मधूनच ठाण्यातल्या नीलंबरी प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट्स बांधकाम केल्याचा ठपका आहे.
8. एकूण अकरा प्लेट्स जप्त झाले आहे 11 फ्लॅट्सची किंमत सहा कोटी 45 लाख रुपये आहे.
9. 2017 मध्ये महेश पटेल आणि चतुर्वेदी यांच्या विरोधात ईडी कडून मनी लॉन्ड्रिंग ची केस दाखल करण्यात आली आहे.