नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | देशामध्ये भविष्यात महामार्गावरुन तुमच्या वाहनाने जर तुम्ही लांबचा प्रवास करीत असणार तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण फायदा देणारी घोषणा केली आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज रस्ते प्रवासाबाबत लोकसभेत सांगितले आहे. स्थानिकांना महामार्गावरुन प्रवास करताना सरकारने मोठी सवलत दिली आहे. सरकारकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना पास देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे.
महामार्गावरुन प्रवास करत असताना वसूल करण्यात येत असलेल्या टोल आणि रस्तेविषयक लोकसभेत माहिती देताना हा टोलविषयीचा निर्णय त्यांनी सांगितला. यावेळी त्यांनी सांगितले की, महामार्गावर टोलनाक्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येणार आहे. 60 किलोमीटरच्या आत दुसरा टोल नाका नसावा असा नियम सरकार तयार करीत असल्याचे स्पष्ट केले. तसेच महामार्गाजवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांना पास देण्यात येणार असून या पासमुळे त्यांच्याकडून टोल वसूल केली जाणार नाही. केंद्र सरकारची ही योजना तीन महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.