जळगाव राजमुद्रा दर्पण | मोहाडी रस्त्यावरून दुचाकीवर जात असताना एका शाळेकरी मुलगा ट्रक खाली चिरडल्याची घटना घडली आहे. जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर अपघात झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अपघात झालेल्या ट्रक वर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली असून घटनस्थळावर तणावपूर्ण शांतता आहे. मृत झालेल्या बालकाचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असून पुढील तपास चक्रे पोलीस फिरवत आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या या बालकाचा अपघातात अंत झाल्याने संपूर्ण जळगाव शहर हळहळले आहे.
थोडक्यात घटना अशी की, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे,नगरसेविका रंजना प्रभाकर सोनवणे यांचे नातू व मोहाडीचे माजी सरपंच गणेश प्रभाकर सोनवणे यांचे सुपुत्र सुजय गणेश सोनवणे (वय13) हा शेवटचा पेपर असल्याने सेंट टेरेसा इथे आपल्या शाळेत जात होता, या दरम्यान घरून निघाल्यानंतर मोहाडी रस्त्यावरच भरधाव वेगाने जात असलेल्या एम. एच 28 बी 7703 या ट्रक ने सुजय च्या एम.एच डिएम 111 या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सुजय चा जागीच अंत झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, सुजय च्या अंगावरून भरधाव वाहन गेले आहे.
सुजय हा सेंट टेरेसा या शाळेत शिकत होता अभ्यासात परिपूर्ण अशी त्याची ओळख संपूर्ण शाळेत होती. शाळेत परीक्षा असल्याने पेपर देऊन तो घराकडे निघाला होता त्याच्या सोबत शिपाई राजू गवळी हा वाहन चालवीत होता. मात्र खड्डेमय रस्त्यावर वाहन घरसल्याने वाहनसह दोघे रस्त्यावर कोसळले, आपल्या आजोबांचा सर्वाधिक लाडका नातू सुजय होता. अतिशय तल्लख बुद्धी तसेच नाविन्यपूर्ण गुणी स्वभाव यामुळे सगळ्यांनाच हवासा वाटणारा सुजयची सोनवणे परिवारातून धक्कादायक एक्झिट चटका लावणारी आहे.
पुढील अपडेट्स थोड्या वेळातच….