मुंबई राजमुद्रा दर्पण |एमपीसी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. लवकरच राज्यामध्ये एमपीएससीची मोठ्या प्रमाणात भरती करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ व गट-ब आणि गट क च्या जागा भरण्यासाठी मागणी पत्र दिले आहे. यात तब्बल सहा हजार 356 जागा भरण्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. एमपीएससी आयोग तसेच राज्य सरकारने यासंदर्भातील मागणी पत्र देखील प्रसारित केल आहे. कोणत्या विभागात किती जागा तसेच याबाबत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यामुळे लवकरच एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी व बेरोजगार तरुण तरुणींसाठी ही सर्वात मोठी आनंददायी बातमी राज्य सरकारने दिली आहे. काही दिवसांमध्ये सरकारी नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आता परीक्षांच्या दिला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. राज्यामध्ये विविध भागात लाखो प्रमाणात पदे रिक्त असून मागील पाच ते सहा वर्षांमध्ये सरकारी नोकर भरती झालेली नाही, राज्यातील लाखोंच्या संख्येने असलेले बेरोजगार तरुण या भरतीची वाट मोठ्या आशेने पाहत आहे.
विविध विभागातील लाखो रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने काय योजना आखली यासंदर्भातलं सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला घरचा आहेर देत उपस्थित केला होता. विधानसभेत देखील कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असेल तर आपण सेवा कशी देणार, या मागील सरकारच्या काळातील नोकरभरती केली गेली नाही. या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे, अशी मागणी देखील अनेक दिवसापासून जनमानसातून होती त्याच धरतीवर आता राज्य सरकारने तातडीचे पाऊल उचलत एमपीएससी भरतीला सुरुवात केली आहे.
कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती, अनेकांनी केलेले शिक्षण हे वाया जाण्याची भीती मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये होती. ेल्या काही वर्षांपासून रिक्त असणार्या पदांवर देखील भरती होऊ शकली नाही म्हणून अनेक तरुण नोकरी अभावी मनहीन केल्याचे चित्र होते. मात्र राज्य सरकारने विधिमंडळात घेतलेल्या निर्णयानंतर मोठा दिलासा बेरोजगार तरुणांना मिळाला आहे.