जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरातील समतानगर भागात राहणाऱ्या तरुणाचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण तसेच तणावाचे वातावरण पसरले आहे. खुनाच्या झालेल्या घटनेमुळे पोलीस यंत्रणा देखील खळबळून जागे झाले आहे. सातत्याने होणाऱ्या घटना यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर पुन्हा एकदा गंभीर गुन्हा पोलिसात दाखल झालेला आहे. नेमकी घटना कशामुळे झाली ते अद्याप समजू शकलेले नाही याबाबत पोलीस तपास करीत आहे.
यासंदर्भात मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शहरातील समता नगर भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ सागर नरेंद्र पवार (वय 28) हा तरुण राहत होता. रात्री उशिरा त्याच्यावर हल्ला केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. चाकूचा गंभीर वार झाल्याने त्याला मोठी दुखापत झाली, तो ओरडू लागला त्याच्या आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असताना सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला सागर नरेंद्र पवार आहात अरुण समतानगर भागात एकटाच राहत होता सागर याच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूत्रे हाती घेतली असून पुढील तपास पोलिस करीत आहे यामध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सागर नरेंद्र पवार हा तरुण समता नगर भागात वास्तव्यास आहे. दिवसभराची कामे आपटून तो घराकडे निघाला होता यादरम्यान त्याला घेरण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी सागर वर चाकूने वार करण्यात आला तेव्हा हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले यानंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो मदतीसाठी याचना करू लागला यावेळी परिसरातील काही नागरिकांनी त्याला तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान सागर चा मृत्यू झाला आहे.