पिडीत महिलेला ज्ञाय मिळावा भा ज पा महिलां आघाडी तर्फे निवेदनं
जळगाव राजमुद्रा दर्पण | धरणगाव येथील एक इसम व त्याच्या पत्नीला सोशल मिडिया वर पोष्ट टाकण्याच्या कारणावरून खान्देश सेंट्रल परीसरात बेदम मारहाण करण्यात आली आहे. महिलेला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण, व विनयभंग केला असुन यांच्या निषेधार्थ पिडीत महिलेला न्याय मिळावा यासाठी बुधवार रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांना भा ज पा जिल्हा महानगर महिला आघाडी तर्फे अध्यक्षा दिप्ती ताई चिरमाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनं देन्यात आले आहे.
या प्रसंगी दिप्ती ताई चिरमाडे यांनी सांगितले कि, पिडीत महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा महिलेला मारहाण करून तिचा विनंयभग करण्यात आला असुन शिवसेनाच्या त्या जबाबदार कार्यकर्त्यांवर कठोरपणे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महिला आघाडी तर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या प्रसंगी महिला मोर्चा सरचिटणीस रेखा वर्मा, जिल्हा महानगर उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, वंदना पाटील, ज्योती निंभोरे, ज्योती राजपूत, सरोज पाठक, छाया सारस्वत, मीनाक्षी पाठक, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रेखा पाटील, ज्योती तिवारी, ऋतुजा संत यांच्या सह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.