मुंबई राजमुद्रा दर्पण | म्हाडा च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला आहे. त्याबाबत एक स्थिती व्हिडिओ मध्ये समोर आली आहे. हा गैरव्यवहार औरंगाबादच्या खडकपुरा भागातील एका शाळेत घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे म्हाडाच्या परीक्षा पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या म्हाडा परीक्षेत घोटाळा असल्याची माहिती मिळाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विट करत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती, म्हाडा च्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण राज्यामध्ये नाराजीचा सूर पालक व विद्यार्थ्यांमध्ये उमटत आहे. काही ना काही कारणास्तव परीक्षांच्या वेळेत गोंधळाची संभ्रमावस्था निर्माण होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
Mpsc च्या संन्यवय समितीने केलेल्या आरोपामुळे औरंगाबाद शहरातील खडकपुरा भागात असलेल्या शाळेत केंद्रसंचालंकाशी संगनमत करीत परीक्षेच्या संगणकीय प्रणाली मध्ये मोठा घोळ करण्यात आलेला आहे. याबाबत समन्वय समितीने पुराव्यासह म्हाडाकडे रितसर तक्रार देखील केली आहे. या तक्रारीनंतर टीसीएस कडून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. कंपनीकडून स्पष्टीकरण आल्यानंतर म्हाडा पोलीस तक्रार करण्याबाबत पुढील कारवाई करतील असे सांगण्यात आले आहे.
व्हिडीओ मध्ये परीक्षा होण्याच्या अगोदर दोन व्यक्ती परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना आढळून आल्याचे पाहायला मिळाले आहे. तर एका व्हिडिओमध्ये तिन व्यक्ती परीक्षा होणाऱ्या वर्गामध्ये दिसून आले, त्यातील एक जण खुर्ची जवळ चढून सीसीटीव्ही कॅमेरा जवळ काहीतरी करत असल्याचे आढळले आहे. त्यासोबतच कम्प्युटरसमोर देखील फेरफार करण्यात आले आहे. परीक्षांच्या काळामध्ये विद्यार्थी व सुपरवायझर एकमेकांशी चर्चा करताना दिसून येते. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा रोल नंबर अन्य ठिकाणी असून त्यांना या सेटवर जागा देण्यात आल्या असल्याचा देखील खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.