औरंगाबाद राजमुद्रा दर्पण | महापालिकेच्यावतीने शहरातील व्यावसायिक मिनिटांना मीटर लावण्यासाठी 13 कोटी रुपयांची खरेदी प्रक्रिया रद्द केली आहे. औरंगाबाद शहरात सध्या सोळाशे 80 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे या अंतर्गत काही दिवसापूर्वी स्मार्ट च्या माध्यमातून 13 कोटी रुपयांची खरेदी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती यासंदर्भात मीटर गर्दीचे निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र मनपाने हा निर्णय रद्द करीत 13 कोटी रुपये वाचविले आहे.
शहरातील मुलांना सहा ते आठ दिवसाआड पाणी येते, त्यात पुन्हा मीटर लावणार अशी ओरड नागरिकांकडून सुरू होती. तसेच नव्याने योजने पूर्वी बंद पडलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी चे पाच हजार मीटर सध्या तसेच पडून आहे. असे विविध माध्यमांनी निदर्शनास आणून दिले असता महापालिकेने तात्काळ दखल घेत प्रसिद्ध करण्यात आलेले निविदा तात्काळ रद्द केली आहे. यामध्ये नेमके किती मीटर सुरू आहेत याबाबत चाचपणी करण्यात येत आहे.
5000 फळांसाठी तेरा कोटीच्या खरेदीचा प्रस्ताव महापालिकेत सादर करण्यात आला होता महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील 5000 व्यवसायिक नळांना मीटर बसवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी 13 कोटी 16 लाख रुपयांची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र महापालिकेने समांतर जलवाहिनी योजना राबवताना शहरातील नळांना मीटर बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मीटर च्या किंमती वर मोठा वाद निर्माण झाला यातच आठ दिवसाआड पाणी येते तर मीटर लावून काय फायदा होणार ? असा सवाल देखील उपस्थित केला गेला. सगळ्यात आगोदर पाणी पुरवठा योजना सुरू करा, योजना पूर्ण झाल्याशिवाय मीटर बसविण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जुने 5000 हजार पडून असलेले मीटर मनपाने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबाद मनपाचे 13 कोटी 16 लाख रुपये वाचले आहे.