मुंबई राजमुद्रा दर्पण | बंगल्याचे मीटर काढून नेल्यावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर सध्या अधिक चर्चेत आले आहे. त्यांनी थेट महावितरण च्या कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ केल्याने वाद चिरघळला आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. याप्रकरणी थेट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भाजप आमदार लोणीकरा विरिद्ध कार्यवाही चे आदेश देऊन टाकले आहे. लोणीकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकी त्यांना लोणीकर यांच्या अलगट येण्याची शक्यता आहे शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेला आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्यांना अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल या विषयाबद्दल सकल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राऊत यांनी भाजप आमदार लोणीकर यांना जबरदस्त टोला देखील लगावला आहे माननीय आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनिफिती माहिती मागवली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंता सोबत केलेला हा संवाद धक्कादायक आहे. या दोन्हीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही, स्वतःला संस्कारी म्हणणारे एका पक्षाचे तीस वर्षाहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचा ही बुरखा यानिमित्ताने फाटला असल्याचा टोला लोणीकरां सहीत भाजपला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे