मुंबई राजमुद्रा दर्पण : महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या सुट्टी विषयी शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे महाराष्ट्र मध्ये शाळांना 2 मे ते 12 जून पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांच्या मे महिन्याच्या सुट्टीत चा विषय गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला होता, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये शाळेतील अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्यास त्या घेण्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन मे ते 12 जून पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील शाळा या आपली एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार असून परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ही सुट्टी इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या शाळांना देण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या संपल्या नंतर जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू करण्याचे संकेत देखील राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.
कोरोनामुळे राज्य जगातील शिक्षण व्यवस्था कोलमडली होती, ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अनपेक्षित रिझल्ट आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या या पद्धतीमुळे शिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या शिक्षण व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करण्याची क्षमता दसरत होती. असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आले ज्या शाळांचे अभ्यासक्रम शिकवण्याचा अपूर्ण आहे. अशा शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहणार आहेत, आणि ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्या शाळांना एप्रिलपासून सुट्टी मिळणार असल्याचं शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जाहीर केलेले आहे.