जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सत्तास्थापनेच्या दाव्यावरून अनेक वाद रंगले होते. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया देखील मोठ्या प्रमाणात सुरू होती, पाटील आणि भोसले गटात संघर्षाची ठिणगी पडली असताना मराठा विद्या प्रसारक मंडळावर भोईटे तसेच पाटील गटाने आपला दावा केला होता. यामध्ये न्यायालयाने नरेंद्र पाटील गटाच्या बाजूने निर्णय देत निकाल दिला आहे. अखेर न्यायालयाच्या निकालाने मराठा विद्या प्रसारक संस्थे अंतर्गत नूतन मराठा महाविद्यालया वर पाटील गटाचे एक हाती वर्चस्व आले आहे.
2018 मध्ये नरेंद्र पाटील गटाने मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली होती असे असताना 17-18 या सालात पाटील गटाने शिक्षण संस्थेचे कामकाज पाहिले. 2018 दरम्यान जळगाव शिक्षण अधिकारी यांच्या नावे शेड्युल एक कार्यकारणी अवैध असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी खुलासा करण्या संदर्भात मंत्रालयातून पत्र देण्यात आले होते.
या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडून 15 फेब्रुवारी 2018 रोजी खुलासा देण्यात आला यामध्ये नरेंद्र पाटील गटाकडून शेड्युल एक मध्ये कोणीही कार्यरत नाही. असे आशयाचे पत्र देण्यात आले. भोईटे गटाकडून पोलिसांना सोबत घेत कार्यालयाचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते. मात्र बऱ्याच वर्षाच्या वादग्रस्त संघर्षा नंतर नरेंद्र पाटील गटाचे अखेर न्यायालयाच्या निकाला नंतर पाटील गटाला न्यायालयीन लढाईत यश आले आहे.