चार दिवसात रिक्त असलेली पदे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे
पारोळा
राजमुद्रा
दर्पण |
शिवतीर्थ समोर नँशनल हायवे क्र.नं 6 वर पारोळा तालुका शेतकरी संघटनेचे नेते डॉ.पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको व ठिय्या आंदोलनात करण्यात आले. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सदर आंदोलन हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पारोळा कृषी कार्यालयातील रिक्त असलेल्या तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे असे शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन देखील दखल घेण्यात आली नाही म्हणून आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असे मत बाळासाहेब पाटील यांनी
व्यक्त केले.
शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घ्यावे यासाठी जिल्हा उप कृषी अधिकारी जाधवर व तालुका कृषी अधिकारी वारे यांनी स्वता आंदोलन स्थळी भेट देत रिक्त असलेल्या पदांपैकी चार पदे ही त्वरीत चार दिवसाच्या आत भरण्यात येतील असे आश्वासन दिले व उर्वरित पदे ही टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील असे पत्र कृषी विभागाकडून देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
पारोळा तालुका कृषी कार्यालयात रिक्त असलेल्या पदांबद्दल योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळे आज शेतकरी संघटनेवर आंदोलन करण्याची वेळ आली. तालुका कृषी कार्यालयाला विविध योजना येऊन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नसल्याने 3/4 किमी दुर असलेल्या या कृषी कार्यालयात शेतकरी पायपीट करत जातो परंतु निराशा पदरी घेऊन परत जावे लागते. पारोळा कृषी कार्यालयात अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून 44 कर्मचाऱ्यांची संख्या असतांना 114 खेड्याचा भार फक्त 8 कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने आठही कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागते. त्यामुळे दिलेले आश्वासन
कृषी विभागाने वेळीच पाळले नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने पुन्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देत डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करत आंदोलन मागे घेतले. सदर आंदोलन हे पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पि.एस.आय. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात करण्यात आले.
आंदोलनात बाळासाहेब पाटील, भडगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अभिमन हटकर, शहर उपाध्यक्ष मनोज परदेशी, अमळनेर तालुका शेतकरी संघटना उपाध्यक्ष नरेश चौधरी, पाचोरा जागृत जनमंचचे अध्यक्ष निलंकठ पाटील, उपाध्यक्ष गुलाब पाटील, कमांडो ईश्वर मोरे, राकेश वाघ, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, दौलतराव नाना व पदाधिकारी, पिरणकुमार अनुष्ठान, उमेश नाना, रामराव पाटील, भिम आर्मी संघटना तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे सह शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले.