जळगाव राजमुद्रा दर्पण | भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने जुने जळगांव येथील वीर जवान गृप चे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील यांच्या सोबत त्यांच्या तब्बल ५० तरुण कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पक्ष संघटन बांधणीवर भाजपकडून मोठया प्रमाणात लक्ष केंद्रीय करण्यात येत असून आगामी काळात सर्वाधिक युवकांचा भाजप प्रवेश करून घ्यावा असे वरिष्ठ पातळीवर वरून कळविण्यात आले आहे. पक्षाचे विचार तळागाळा पर्यत पोहचावे, तसेच केंद्रातील मोदी सरकारने सामान्य जनतेसाठी दिलेल्या योजनांचा लाभ या साठी जनजागृती करावी असे आवाहन माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले.
यावेळी जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे , दिपक सुर्यवंशी , आरोग्यदूत अरविंद देशमुख , युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे , मिलिंद चौधरी , भूषण भोळे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.