जळगाव राजमुद्रा दर्पण | कुठल्याही संस्थेतून अथवा क्रेडिट सोसायटी मधून कर्ज घेतले अथवा सभासद नसताना बेकायदेशीर पद्धतीने थकबाकीदार असल्याचा दाखल दिला म्हणून थेट उमेदवारी रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तरसोद येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विरोधी उमेदवार हा थकबाकीदार असल्याचा ठपका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठेवत चक्क उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी किशोर भाऊराव पाटील यांनी पोलिसात केली आहे.
तरसोद गावात विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यामध्ये अनेक इच्छुक आपले नशीब आजमावत आहे.
पोलिसांत दिली तक्रार..
पंकज साहेबराव पाटील हे विविध कार्यकारी सोसायटी चे सभासद असून गेल्या अनेक दिवसांपासून ते कारभार पाहत आहे. पंकज साहेबराव पाटील यांच्या सांगण्यावरून अनिल संभाजी पाटील यांनी खान्देश अर्बन क्रेडीड सोसायटीचे अध्यक्ष व शासन नियुक्त विशेष विक्री व वसुली अधिकाऱ्यांन सोबत संगनमत करून थकबाकीदार असल्याचा खोटा दाखला तयार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची दिशाभूल करीत सादर केला आहे. यावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी थेट आमचे उमेदवारी अर्ज रद्द केले असल्याचा आरोप किशोर भाऊराव पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी आम्ही न्यायालयात देखील जाणार असल्याचा इशारा किशोर पाटील यांनी दिला आहे.
पंकज साहेबराव पाटील हे स्वतः सोसायटी निवडणुकी मध्ये उमेदवारी करीत आहे. त्यांनी विजयी होण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरत बेकायदेशीर कामे केली असून अशोक रुपसिंग अलकारी व छायाबाई अशोक अलकारी यांच्या बाबत देखील अशाच बेकायदेशीर पद्धतीने अनिल संभाजी पाटील यांच्या हस्ते निवडणूक अधिकऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असल्याचा आरोप देखील किशोर भाऊराव पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी शासनाची फसवणूक केली म्हणून भां.द.वी कलम ४०६,४०९, ४२०,४६४,४६५, ४६८, ४६८, ४७०,४७१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी नशिराबाद पोलीस निरीक्षक यांच्या कडे करण्यात आली आहे.