जळगाव राजमुद्रा दर्पण : शहरातील मध्यवर्ती राष्ट्रीय महार्गावर असलेल्या कालिंका माता चौफुली वर उड्डाण पूल बनविण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. विविध विकासकांमाचा शुभारंभ व घोषणा करण्यासाठी शिवतीर्थावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान गडकरी यांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आकाशवाणी चौफुली, ईच्छा देवी चौफुली,अजिंठा चौफुली यासह कालिंका माता चौफुली येथे उड्डाण पुलाची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केल्याने जळगावकर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दोन दिवसांपूर्वीच कालिंका माता चौफुली येथे स्थानिक नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले होते, कालिंका माता चौफुलीवर सतत होणारे अपघात यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत रास्ता रोको करण्याचा पवित्रा घेतला होता, मात्र या आंदोलनाची चुणूक लागताच जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील यांनी आंदोलन स्थळ गाठत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याच्याकडे उड्डाण पुलाची मागणी करून समस्या सोडवणार असे आश्वासन खा. उन्मेष पाटील यांनी दिले होते.
शिवतीर्थावर केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महार्गावर होत असलेल्या अपघात स्थळाची माहिती दिली व उड्डाणपूल मंजूर करून घ्यावे अशी मागणी देखील खा. पाटील यांनी केली या दरम्यान मंत्री गडकरी यांनी आपल्या भाषणात उड्डाण पुलाची घोषणा करत प्रस्ताव द्या मंजुरी देतो असे आश्वासन दिल्याने जळगावकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.