जळगाव राजमुद्रा दर्पण : शहरातील रस्त्याच्या संबंधित तसेच शहराला जोडणाऱ्या महार्गावर उड्डाणपुल , अंडर पास, साईट पट्ट्या,अशा विविध मागण्यांसाठी महापौर जयश्री महाजन यांनी शिवतीर्थ येथे जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत मागण्याचे निवेदन दिले आहे. ना. गडकरी यांनी थेट मागण्याची दखल घेत केलेल्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहराच्या समस्या न विषयी महापौरांना दिले आहे.
यावेळी जळगावकरांच्या वतीने महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी ना.नितीनजी गडकरी यांना जळगाव शहर संदर्भात दोन निवेदन दिले. पहिल्या निवेदनांत महापौरांनी जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जाणारा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ठिकठिकाणी उड्डाणपुल विकसित करुन मिळणेबाबत गडकरी यांना विनंती केली. “बांभोरी जवळील जुने जकात नाक्यापासून ते पुढे खोटे नगर स्टॉप, शिव कॉलनी, अग्रवाल हॉस्पिटल, आकाशवाणी चौफुली, इच्छादेवी चौफुली, नेल्सन मंडेला चौफुली, कालिंकामाता मंदिराजवळील चौफुली असा संपूर्ण सुमारे 7 किलोमीटरचा महामार्ग हा उड्डाणपुल म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. तसेच या राष्ट्रीय महामार्गलगतचे 12 मीटरचे सेवामार्ग विकसित केल्यास अवजड वाहने हे उड्डाणपुलावरुन जातील व शहरातील नागरिकांची वाहने सेवामार्गाचा अवलंब करतील.”
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जाणारे मुंबई, नागपुर, पाचोरा, इंदौर व औरंगाबाद महामार्गाला जोडणारे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विकसित करुन मिळणेबाबत विनंती केली. “शिव कॉलनी राष्ट्रीय महामार्ग क्र. एन 53 पासून निघणारा व पाचोरा राष्ट्रीय महामार्ग क्र. एन 753जे तसेच औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. एन753एफ ला जोडणारा 30 मीटर रुंद रस्ता तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 दिपक फुडस्च्या पश्चिम बाजुने जाणारा 18 मीटर रुंद रस्ता व वाटिका आश्रम लगत राष्ट्रीय महामार्ग क्र. एन 53 पासून पिंप्राळा गट क्र. 118 मधुन जाणारा पिंप्राळा गट क्र. 244 पर्यंत जाणारा 24 मीटर विकास योजना रस्ता जळगाव शिवार स.क्र. 307 दुध फेडरेशन पासून निघणारा व जळगाव स.क्र.118 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र.एन 53 ला जाणारा 24 मीटर रुंद विकास योजना रस्ता, रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग, भारत सरकार, यांचे निधीतून आवश्यक ती संपादन प्रक्रिया करुन विकसित करुन मिळावे” अशी मागणो करण्यात आली.
जळगाव शहरातून जाणाऱ्या व जळगाव शहराला जोडणाऱ्या महामार्गांन संदर्भात ही दोन निवेदने महापौरांनी ना. नितीनजी गडकरी दिली. खान्देशच्या विकास साठी गडकरी यांनी भरीव निधी दिला आणि वेळेत सर्वे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी महापौर महाजन यांनी गडकरी यांचे समस्त शहराच्या वतीने त्यांनी आभार मानले.