जळगाव राजमुद्रा दर्पण : एका प्रेमी युगुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे घटना उघडीस आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. नेमकी आत्महत्या करण्यास कोणते कारण कारणीभूत आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहे. युवक-युवतीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यात विश्राम जिन्सी येथे एका मुलाने व मूलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवक आणि युवती ही अविवाहीत असुन गावापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. प्रकरणातुन या दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा सध्या लोकांमध्ये मध्ये केली जात आहे.
घटनास्थळी रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे आदि सहका-यांसह पोलीस पथक दाखल झाले आहे.. दोघा प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.