चाळीसगाव राजमुद्रा दर्पण – जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती संदर्भात शिक्षकांचा त्रागा होत असुन जिल्हा प्रशासनावरील विश्वास कमी होत असून जिल्हा परीषद प्रशासनाने आग्रही भूमिका घेऊन पदोन्नती प्रक्रीयेस तात्काळ गती द्या अन्यथा या शिक्षकांच्या मागे नाही तर पुढे येऊन मला भुमिका घेण्यास भाग पाडू नका. अशा कडक सुचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हा परीषद प्रशासनाला दिल्या आहेत. आज पदोन्नती रखडलेल्या या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आज चाळीसगाव येथील जनसंपर्क कार्यालयात खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
याप्रसंगी खा. उन्मेष पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ( प्राथ.) यांचेशी चर्चा करुन अडीअडचणी समजून घेत शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी पदोन्नती प्रक्रिया गतिमान पद्धतीने करणे विषयी स्पष्ट सूचना दिल्यात. उपस्थित शिक्षकांच्या शिष्टमंडळाने खा. उन्मेष पाटील यांनी आभार व्यक्त केले.