जळगाव राजमुद्रा दर्पण | आव्हाने कानळदा या ग्रामीण भागाला जोडणारा रस्ता हा नव्याने तयार झालेला असून हा रस्ता शिवाजीनगर,लाकूड पेठ,लक्ष्मीनगर,के.सी पार्क या रहिवासी एरियाला मधून जातो या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यामध्ये असलेले ड्रेनेज लेवल ने रस्ता तयार न करता ड्रेनेज पेक्षा खाली केलेल्या असल्याने सदर ट्रेनचे रोडपासून कमीत कमी आठ दहा इंचावर आलेले आहे. नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरून वाहने जात असल्याने मध्ये असलेल्या ड्रेनेज मुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले होते.या ड्रेनेज मुळे जीवित हानी सुद्धा झालेली होती परंतु धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी सलग पंधरा दिवस पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता व संबंधित ठेकेदारांना भेटून सलग पंधरा दिवस पाठपुरावा केला या पाठपुराव्याला आज यश आलेला आहे.
रोड आणि ड्रेनेज हे आता एक लेवल झालेले आहे. म्हणजे यापुढे त्या ठिकाणी अपघात होणार नाही.धर्मरथ फाउंडेशन तर्फे प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिला होता, आणि त्याच्या कमी कालावधीमध्ये प्रशासनाने हे काम पूर्ण केले निमित्ताने विनायक पाटील यांनी धर्मरथ फाउंडेशन तर्फे आभार मानले. यावेळी उपस्थित अनिल मराठे,योगेश साडी,संतोष भिंताडे,सोनू माळी,कुलदीप पवार,गौरव गाढवे उपस्थित होते.