मुंबई राजमुद्रा दर्पण | शिवसेना खा. भावना गवळी यांना ईडी ने समन्स दिले असून पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर रहावे असे म्हटले आहे. यावेळी शिवसेना खा. भावना गवळी जर अनु उपस्थित राहिल्या तर त्यांच्या विरोधात वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हे वॉरंट जामीन पत्र असेल त्यामुळे यावेळी ईडीच्या समन्स नुसार जर भावना गवळी चौकशीला गेले नाहीत तर मात्र त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात भावना गवळी यांची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, या आधी देखील भावना गवळी यांना ईडी कडून समन्स बजवण्यात आलं होतं, मात्र वेगवेगळ्या कारणामुळे चौकशीला येऊ शकत नाही असं कळवलं होतं मात्र आता आलेल्या समन्स नुसार शिवसेना खासदार भावना गवळी यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे नेमकं हे प्रकरण कसे वळण घेत याकडे लक्ष लागून आहे.
काय आहे प्रकरण?
भावना गवळी यांची ज्या प्रकरणात चौकशी केली जात आहे. ते म्हणजे श्री बालाजी पार्टिकल बोर्ड नावाने त्यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार मंडळाने 29 कोटी रुपयाचं तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचे अनुदान दिलं मात्र 43 कोटी रुपयाचा अनुदान घेऊन ही गवळी यांनी कारखाना सुरू केलेला नाही उलट सात कोटी रुपये मुल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्या दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात देण्यात आला आहे. या घोटाळ्या प्रकरणी गवळी यांनी सिए भूपेंद्र मुंडे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहारात ईडी कडून चौकशी केली जात आहे.