जळगाव राजमुद्रा दर्पण | हवामानाच्या बदलाच्या झालेला परिणाम व त्याचा प्रभाव मानवजातीवर अधिक दिसून येतो त्याच पद्धतीने यंदाचा उन्हाळा अतिशय दाहकता देणार आहे अनेक ठिकाणी उन्हाळ्यात मोबाईलचे स्पोर्ट झाल्याची घटना आपण झाल्याचे आपल्याला माहितीच आहे मात्र या चुका टाळण्यासाठी आपल्याला हा संपूर्ण मजकूर वाचणे गरजेचे असेल, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे यंदाचा उन्हाळा हा उष्माघात देणारा असून यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आपल्या हातात असणारा स्मार्ट फोन याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.
तुमचे जर कामाचे शेड्युल सतत बाहेर फिरण्याचे असेल तर तुम्हाला मोबाईल बाबत काळजी घेणे गरजेचे आहे. आपला मोबाईल जास्त काळ उन्हात राहणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. सध्या सातत्याने मोबाइल अतिशय गरम होत असल्याचे निदर्शनास आले असून अनेक मोबाईल कंपन्यांना या संदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहे. यामुळे मोबाईल वर जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला सावलीत उभे राहूनच मोबाईल वर बोलणे गरजेचे आहे. अथवा संपर्क होत असताना कानाला फोन लावणे देखील चुकीचे आहे यासाठी आपण चांगल्या ब्रँडेड कंपनी चा हेडफोन वापरू शकतात.
आपला मोबाईल जर सतत गरम होत असेल किंवा मोबाईलवर जास्तीत जास्त संभाषण वाटत असेल तर आपण थंड वातावरणात मोबाईल ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून स्पोर्ट होण्याच्या घटना आपल्याला टाळता येणार आहे स्पोर्ट झाल्यामुळे अनेकांचे अवयव हे निकामी झाल्याचे समोर आले आहे. यासाठी आपण मोबाईल आपला थंड वातावरणात ठेवणे गरजेचे आहे.
मोबाईल फोन जर आपण चार्जिंग करत असाल तर मोबाईल फोन आपला उन्हात ठेवणे चुकीचे आहे. घरात मोबाईल फोन चार्जिंग होताना देखील किचन मध्ये ठेवू नये जेणेकरून किचन मध्ये ठेवल्यास त्या ठिकाणी गॅस शेगडी मधून येणारी गरम वाफ आपल्या मोबाईल फोनला नुकसान होऊ शकते. यामुळे गॅस शेगडी जवळ मोबाईल फोन ठेवू नये रेडिएशनमुळे देखील फोनला हानी पोहोचण्याची शक्यता असते.