जळगाव राजमुद्रा दर्पण |ग स सोसायटी जळगावच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी वेळी लोकसहकर गटातील दोन संचालक पैश्याला बळी पडले आणि आपली नैतीकता दुसर्याच्या दावनीला बांधली. या दोन्ही संचालकांनी त्यांचा राजीनामा लोकसहकार गटा कडे द्यावा, मग त्यांनी खुशाल सहकार गटा ची गुलामी करावी असे खळबळजनक आरोप लोकसहकार गटातील संचालकांनी केले आहे.
या संदर्भात सोशल मीडिया वर पत्रक देखील व्हायरल होत आहे. सत्ता ही लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना यांची होती.ग स सोसायटी च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नीवडीमुळे संपुर्ण जळगांव जिल्हयात दोन्ही फुटीर संचालकांना सभासद शिवीगाळ करत असून त्यांना माफी मिळणार नाही असे देखील म्हणत आहे.
व्यवसाया ने शिक्षक असलेल्यानी असे निर्णय घेतल्याने भवीष्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. सहकार गटा च्या एकही संचालकानां सभासद काहीच बोलले नाही. गटा ची गद्दारी करणार्यानां धडा शिकवावाच लागेल. पुढील पांच वर्ष सभासद त्यानां माफी देणार नाही. असा पवित्रा लोकसहकार गटाचे संचलक दिलीप चांगरे यांनी घेतला आहे.