जळगाव राजमुद्रा दर्पण | ग.स.च्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यात उदय पाटील अध्यक्ष आणि रवींद्र सोनवणे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
निवडणुकीचा निकाल लागत असताना लोकसहकर गटातून सहकार गटाकडे आलेल्या रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांसोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यासोबतच सहकार गटाचे ११ संचालक मतदानासाठी ग.स.जवळ आले असता, त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यामुळे संचालकांना गाडीतून उतरता आले नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात सर्व मतदारांना मतदानासाठी हॉलमध्ये पोहोचता आले. हॉलमध्येदेखील रवींद्र सोनवणे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ग.स.निवडणुकीत ९ संचालक सहकार गटाचे, प्रगतीचे ६ आणि लोक सहकारचे ६ जण निवडून आले . या त्रिवर्ग परिस्थितीमुळे ग.स. चे अध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेकांनी जय्यद तयारी केली होती. त्यात लोक सहकार गटाकडून निवडून आलेले रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सहकार गटाला पाठिंबा दिला.