बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या यशस्वी कार्यकाळाला सात वर्षे पुर्ण केले असून विविध स्थरावर या कामाची स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्त्यांकडून दखल घेतली जात आहे. त्यानिमीत्ताने भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहराच्या वतीने बोदवड तालुक्यातील तळागाळातील नागरिकांना व गरजूंना १००० मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
केंद्रातील भाजपा (NDA) नरेंद्र मोदी सरकारला दि.३० मे २०२१ रोजी सात वर्ष पूर्ण झाले असून पक्षाच्या वतीने या वर्षी कुठल्या प्रकारची जाहिरात, होर्डिंग व आनंद उत्सव साजरा न करता कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे सेवाकार्यच्या माध्यमातून मदत करण्याचे ठरवले आहे. आज (ता ३०) रविवार रोजी भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील तळागाळातील लोकांचे कोरोना पासुन संरक्षण व्हावे यासाठी १००० मास्कचे वाटप करण्यात आले.
“भारतीय जनता पार्टी ही सेवाकार्य करणारी पार्टी असून देशाचे लाडके प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी हे गेल्या सात वर्षापासून सेवा परमधर्म या भावनेतून काम करीत आले आहे. पक्षाचे व मोदीजीचे आदर्श घेऊनच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते संपूर्ण भारतात या कोरोनाच्या महामारीत सेवाकार्य करत आहे व लोकांना लागेल ती मदत करत आहे.” असे याप्रसंगी बोलतांना भारतीय जनता पार्टीचे बोदवड तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, भाजपा तालुकाउपाध्यक्ष भागवत चौधरी, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव,भाजपा शहराध्यक्ष नरेश आहूजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, सोशल मिडिया तालुकाप्रमुख रोहित अग्रवाल, नाडगांव गण प्रमुख सुधीर पाटिल, बुथ अभियान प्रमुख दिलीप घुले, राम आहुजा, पंकज चांदुरकर, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल, वैभव माटे, महेंद्र पाटिल आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती तालुका सोशल मीडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी राजमुद्राला दिली.