जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी रस्त्यांच्या कामांची तपासणी सुरु केली. बुधवारी स्वातंत्र्य चौकापासून पांडे डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याची तपासणी केली असून कायदेशीरपणे काम न झाल्यास दुर्लक्ष केली जाणार नाही, अशी सूचना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिली आहे.
आयुक्त डॉ. गायकवाड बुधवारी १०.३० वाजता रस्त्यांच्या कामाची तपासणी करण्यासाठी जात असतांना त्यांना स्टेडीअम चौका समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया जवळील रस्त्यावरील खड्डा दिसून आल्याने त्यांनी त्याची माहिती घेतली. तसेच तातडीने पाईपलाईनच्या लिकेजची दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर स्वातंत्र्य चौक ते पांडे डेअरी चौक रस्त्याची पाहणी करुन बी.एम. ची तपासणी करुन मक्तेदार व मनपाच्या अधिकाऱ्यांना कार्यादेशातील तपशीलाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता विलास सोनवणी उपस्थित होते.
नवीन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी चांगलाच धडाका लावला असून कामात कंजुसी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
बुधवारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मलेरिया विभागातील तीन जणांचे निलंबन केले असून ४१ कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस पाठवल्या होत्या.