जळगाव राजमुद्रा दर्पण | नीट पीजीकडून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. शुक्रवारी नीट पीजी स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून यानंतर या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहे, ते nbe.edu.in, natboard.edu.in वर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.अधिकृत वेबसाइटशिवाय थेट लिंकद्वारे देखील हे कार्ड पाहता येईल.
ही परीक्षा २१ मे २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे.
नीट पीजीद्वारे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. लॉगिन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील पायऱ्या वापराव्यात.
१. उमेदवारांनी सर्वात आधी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) च्या वेबसाइट nbe.edu.in वर जा.
२. होमपेज वर NEET PG Admit Card च्या लिंक वर क्लिक करा आणि नंतर लॉग इन करा.
३. आता तुमचे लॉग इन डिटेल्स नोंदवा आणि सबमिट बटण वर क्लिक करा.
४. तुमचे NEET PG अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसेल.
५. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी ते काळजीपूर्वक वाचावे. त्यातील परीक्षा केंद्र, परीक्षेची तारीख आणि वेळ आदी सर्व माहिती वाचावी.
या सूचनांचे सर्व उमेदवारांना परीक्षेदरम्यान पालन करायचे आहे.
उमेदवारांनी रिपोर्टिंग टाइम किंवा त्यापूर्वी परीक्षा केंद्रात पोहोचायचे आहे. उमेदवार परीक्षेवेळी उशीरा आल्यास त्याला परीक्षा देता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी आपलं अॅडमिट कार्ड, आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साइज फोटो देखील घेऊन जाणे गरजेचे आहे.