जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या दोन दिवसांत जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे वृत्त हाती येत आहे. रावेर, मुक्ताईनगर येथे तोक्ते चक्री वादळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. चक्रीवादळामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. त्याला आधार देण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्याच्या सोबत माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खा.रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष, आमदार राजुमामा भोळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात घडणाऱ्या तसेच भाजप अंतर्गत असणाऱ्या महत्वपूर्ण विषयांची माहिती ते घेणार आहे. रावेर, मुक्ताईनगर येथे पक्षाच्या अति महत्वाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविणार आहे. भाजप मध्ये घडणाऱ्या राजकीय उलथा पालथ यावर नेमकं काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
जळगाव महापालिकेत एका मागून एक नगरसेवकांचा भाजप मधून बाहेर पडण्याचे सत्र सुरू असताना माजी मुख्यमंत्री , विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्वपूर्ण मनाला जात आहे. भाजप मधून आगोदर 27 तर शनिवारी 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.आणखी काही नगरसेवक सेनेच्या वाटेला असून या सर्व महत्वाच्या राजकीय घडामोडी चा आढावा घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.