मुंबई राजमुद्रा दर्पण | अभिनेता अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे खिलाडी अक्षय कान्स चित्रपट महोत्सावाला हजेरी लावणार नसल्याचे समजते.
अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भातील माहिती देऊन, अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. अक्षय कुमारने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत.” ही पोस्ट अक्षयने अनुराग ठाकूरला टॅग केली आहे.अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अक्षय ‘राम सेतु’ सिनेमाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात एआर रहमान, आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि शेखर कपूरसोबत हजेरी लावणार होता. अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षयचे चाहते त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत.