पुणे राजमुद्रा दर्पण | पुणे शहरात त्याबरोबरच बाहेरील वस्तीतील हॉटेल्स, बार, क्लबमध्ये पहाटेपर्यंत तरुण तरुणींच्या हॉट असलेल्या हुक्कापार्ट्या त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंढवा येथील वॉटर बारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुराणिक यांनी हॉटेलमध्ये कारवाई करत असताना तरुणांना व कामगाराना मारहाण केली, तर महिला पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे .गेल्या महिन्याभरापासून ही कारवाई पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे. योग्य नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागास कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, मारहाण न करता कारवाई करण्याच्या सूचना असताना वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी मारहाण केली असल्याने या कारवाई विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे.रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरुच असलेल्या हॉटेल्स, बारना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या.
सूचना देऊनही वॉटर बर वेळेत बंद न केल्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मुंढवा पो. स्टे. हद्दीतील वॉटर बारमध्ये काही तरुणांना व तरुणींना पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.यासोबतच हॉटेल कामगारांवर देखिल करवाई झाली.